कृषी उत्पन्न बाजार समिती बेळगाव आणि कृषी अधिकाऱ्यांनी कोरोना काळामध्ये बदललेले भाजीमार्केटचे वेळापत्रक आता पुनश्च पूर्वीप्रमाणे करण्यात आले असून शेतकऱ्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीने एका पत्रकाद्वारे केले आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती बेळगाव आणि कृषी अधिकाऱ्यांनी कोरोना काळामध्ये भाजीमार्केटचे वेळापत्रक बदलले होते. मात्र आता सदर वेळापत्रक पुन्हा पूर्वीप्रमाणेच करण्यात आले आहे. मार्केटमध्ये येणारे तमाम शेतकरी बांधव व्यापारी व परगावाहून येणाऱ्या व्यापाऱ्यांकरिता सोयीचे होण्यासाठी खालील प्रमाणे सुधारित वेळापत्रक असणार आहे.
येत्या मंगळवार दि. 28 सप्टेंबरपासून भाजी मार्केटचे सुधारित वेळापत्रक मंगळवारी दुपारी 1 पासून सायंकाळी 7 वाजेपर्यंत, बुधवार दि. 29 रोजी सकाळी 6 पासून 10 वाजेपर्यंत आणि दुपारी 1 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत.
हे वेळापत्रक रविवारपर्यंत कायम असेल. सोमवारी सकाळी 6 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत, मात्र त्यानंतर मंगळवारी दुपारी 1 वाजेपर्यंत मार्केटला आठवड्याची सुट्टी असणार आहे. तरी शेतकरी बांधव आणि व्यापाऱ्यांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन कृषि उत्पन्न बाजार समिती बेळगावने केले आहे.