Tuesday, December 24, 2024

/

चापगावनजीक आढळला अनोळखी मृतदेह

 belgaum

खानापूर तालुक्यातील चापगाव गावाजवळील ब्रिजनजीक एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे.

मलप्रभा नदीच्या पात्रातून वाहत येऊन चापगाव ब्रीजनजिक सदर मृतदेह काठावर येऊन पडला असल्याचे सांगण्यात येत आहे.

तरी कोणाच्या घरातील एखादी व्यक्ती बेपत्ता असल्यास अथवा सदर अनोळखी मृत व्यक्तीला कोणी ओळखत असल्यास त्यांनी नंदगड पोलीस ठाण्याशी 9480804087 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सदर घटनेची नंदगड पोलिसात नोंद झाली असून पोलिस मयत व्यक्तीसंदर्भात अधिक तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.