निपाणी यरनाळ रोडवर निपाणी पोलिसांनी केलेल्या कारवाईत एक किलो हून अधिक गांजा जप्त करण्यात आला आहे. गांजा तस्करी प्रकरणी पोलिसांनी तिघा जणांना अटक केली आहे.
बेळगाव शहरासह जिल्ह्यात गांजा आणि इतर अंमली पदार्थांची तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
या विक्रीतून तरुणांना नादी लावण्याचा प्रयत्न जोरदार सुरू झालाय.
या प्रकरणी आता पोलिसांनी कंबर कसली आहे आणि पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार या रोडवर याप्रकारे गांजाची तस्करी केली जात असल्याची माहिती उपलब्ध झाली होती. यावरून निपाणी पोलिसांनी ही कारवाई केली असून 1237 ग्रॅम गांजा जप्त केला आहे तर तिघांना अटक केली आहे.
सोहेल, हमीद आणि राजू अशी अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावे असून ते तिघेही कुडची येथील आहेत. निपाणी मार्गे हा गांजा कुडची येथे आणण्यात येत होता अशी माहिती पोलिसांना उपलब्ध झाली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.