*खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समिती तर्फे खानापूर तालुक्यातील शिक्षकांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.*
*नंदगड येथील आनंदगड महाविद्यालयाचे मुख्याध्यापक नारायण मल्लाप्पा देसाई, गणेबैल प्राथमिक मराठी शाळेचे मुख्याध्यापक . सदानंद पाटील, ढेकोळी प्राथमिक मराठी शाळेचे सहशिक्षक . नारायण करंबळकर यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी ठरले म्हणून त्यांचा खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समिती खानापूर तर्फे सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खानापूर युवा समितीचे अध्यक्ष .धनंजय पाटील होते,अध्यक्ष धनंजय पाटील यांच्या हस्ते शाल,गौरव चिन्ह,पेन व गुलाब पुष्प देऊन सत्कार मूर्तींचा सत्कार करण्यात आला,यावेळी बोलताना राष्ट्रपती पदक विजेते आबासाहेब दळवी सर म्हणाले,समाज सुधारणेचा खरा मार्गदर्शक हा शिक्षक असून त्याची जाणीव ठेवून शिक्षकांनी कार्य केले पाहिजे, सत्कारमूर्तींनी तळागाळातील विद्यार्थ्यांना घडविले म्हणून ते आदर्श शिक्षक ठरले व त्याची जाण ठेवून खानापूर युवा समितीने त्यांचा यथोचित सन्मान केला त्याबद्दल युवा समितीचेही अभिनंदन केले.
अध्यक्षस्थानावरून धनंजय पाटील यांनी बोलताना मराठी शिक्षका प्रति सद्भावना व्यक्त केली व मराठी माणूस,मराठी संस्कृती,अस्मिता,मराठी विद्यार्थी मराठी शाळांसाठी जे काही करता येईल ते युवा समितीतर्फे कार्य अविरत चालू राहील,अशी ग्वाही दिली, यावेळी पांडुरंग सावंत,ऍड.अरुण सरदेसाई,सौ.अरुंधती आबासाहेब दळवी,अर्जुन देसाई,रामचंद्र गावकर व सत्कार मूर्तींची यथोचित आपले मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक युवा समितीचे सल्लागार व हलगा ग्राम पंचायतीचे सदस्य .रणजित पाटील यांनी केले,यावेळी सल्लागार राजू पाटील, खानापूर समितीचे सचिव गोपाळ देसाई, गोपाळ पाटील, राजाराम देसाई,पुंडलीक पाटील,ज्ञानेश्वर सनदी,किशोर हेब्बाळकर,भुपाल पाटील, विशाल बुवाजी उपस्थित होते, सचिव सदानंद पाटील यांनी आभार मानले