Saturday, April 27, 2024

/

राष्ट्रीय स्पर्धेसाठी ‘या’ दोघांची अभिनंदनीय निवड

 belgaum

राज्यस्तरीय स्पर्धेत सुयश मिळविल्याने बेळगाव स्विमर्स क्लबचे उदयन्मुख जलतरणपटू कु. वेदांत मिसाळे आणि कु. अद्वैत दळवी यांची ग्लेनमार्क 37 व्या उपकनिष्ठ आणि 47 व्या कनिष्ठ राष्ट्रीय जलतरण अजिंक्यपद स्पर्धेसाठी अभिनंदनीय निवड झाली आहे.

कर्नाटक राज्य जलतरण संघटनेतर्फे बेंगलोर येथील बसवणगुडी स्विम सेंटर येथे नुकतेच एनआरजे राज्यस्तरीय उपकनिष्ठ, कनिष्ठ आणि वरिष्ठ जलतरण अजिंक्यपद स्पर्धा 2021 -22 चे आयोजन करण्यात आले होते. सदर राज्यस्तरीय स्पर्धेत स्विमर्स क्लब बेळगाव आणि ॲक्वेरियस क्लब बेळगावच्या 15 जलतरणपटूनी भाग घेऊन उत्कृष्ट कामगिरी बजावताना 2 रौप्य आणि 10 कांस्य पदके हस्तगत केली.

सदर स्पर्धेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल कु. वेदांत मिसाळे आणि कु. अद्वैत दळवी यांची ग्लेनमार्क 37 व्या उपकनिष्ठ आणि 47 व्या कनिष्ठ राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे. स्विमर्स क्लब व ॲक्वेरियस क्लबच्या जलतरणपटूंनी राज्यस्तरीय स्पर्धेत मिळविलेले यश खालीलप्रमाणे आहे.Swimming

 belgaum

वेदांत मिसाळे -100 मी. बटरफ्लाय रौप्य पदक, 50 मी. बटरफ्लाय कांस्य पदक. अद्वैत दळवी -50 मी. बॅकस्ट्रोक रौप्य पदक, 100 मी. बॅकस्ट्रोक कांस्य पदक. सुनिधी हलकारे -100 मी. बॅकस्ट्रोक कांस्य पदक, 200 मी. बॅकस्ट्रोक कांस्य पदक. अहिका हलगेकर -50 मी. बॅकस्ट्रोक कांस्य पदक, 100 मी. बॅकस्ट्रोक कांस्य पदक. समृद्धी हलगेकर -100 मी. बॅकस्ट्रोक कांस्य पदक. आर्यन पाटील -200 मी. बटरफ्लाय कांस्य पदक, 100 मी. बॅकस्ट्रोक कांस्य पदक. अनिष पै -50 मी. बॅकस्ट्रोक कांस्य पदक, निधी कुलकर्णी -100 मी. बॅकस्ट्रोक चौथा क्रमांक. श्लोक जाधव -100 मी. फ्रीस्टाइल चौथा क्रमांक.

उपरोक्त सर्व जलतरणपटू रोटरी कार्पोरेशन स्पोर्ट्स अकॅडमीचा गोवावेस येथील जलतरण तलाव आणि जेएनएमसी जलतरण तलाव या ठिकाणी जलतरणाचा सराव करतात. या सर्वांना प्रशिक्षक प्रसाद तेंडुलकर, अक्षय शेरेगार, अजिंक्य मेंडके, नितीश कुडुचकर आणि गोवर्धन काकतकर यांचे मार्गदर्शन तर डॉ. प्रभाकरराव कोरे, डॉ. विवेक सावजी, रो. अविनाश पोतदार, उमेश कलघटगी, सुधीर कुसाणे आदींचे प्रोत्साहन लाभत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.