Tuesday, January 28, 2025

/

बोरगाव औद्योगिक वसाहतीत महाजन टेक्स्टाईलच्या कामगाराची गळफासाने आत्महत्या

 belgaum

बोरगाव तालुका निपाणी येथील औद्योगिक वसाहतीतील महाजन टेक्स्टाईल च्या कामगाराची गळफासाने आत्महत्या घडल्याची घटना उघडकीस आली.सुधीर राजावत असे गळफासाने आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.

सदर घटनेची घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की मयत सुधीर राजावत (25) मध्यप्रदेश राज्यातील तालकापूरहवेली (ता आंबा) येथील रहिवाशी होता.तो बोरगाव येथील भूपाल महाजन यांच्या मालकीच्या रॅपियर टेक्स्टाईल कारखान्यामध्ये काही महिन्या पासून हा बिम गेटर म्हणून काम करत होता.

सदर कारखान्यात एकूण 5 कामगार असून कारखान्याचे दोन शिफ्ट मध्ये काम केले जात असायचे. शनिवार रात्री 11 च्या सुमारास आपल्या चुलत भावंडांसह टेक्सटाइल कारखाना येथील विश्रांती खोलीत झोपला असता.अचानक पहाटे 3 च्या सुमारास बाजूच्या खोलीत आतून लॉक करून कारखान्याच्या लोखंडी तुळीला गळफास घेवून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले आहे.

 belgaum

सदर युवकाचा वर्षा पूर्वी विवाह झाला असून घरची परिस्थिती हालाक्याची होती. शिवाय दिवसभरच्या कालावधीमध्ये सुधीर हा अस्वस्थ होता.त्यामुळे आत्महत्या केल्या मागचे नेमके कारण सायंकाळी उशीरा पर्यंत समजू शकले नाही.त्यामुळे भागात पुन्हा भितीचे वातावरण निर्माण होऊन पंचक्रोशीतून हळहळ व्यक्त केली जात आहे.

सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी सदलगा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रवींद्र अज्जनवर यांच्यासह सहाय्यक पोलीस सहदेव गोडसे यांनी पंचनामा करून मृत्यदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.