स्टार एअर विमान कंपनीने बेळगाव, हुबळी आणि गुलबर्गा येथील विमानतळावर विमान सेवा सुरू केल्यामुळे कर्नाटकात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली आहे. आता लवकरच कर्नाटकातील सर्व प्रमुख शहरे स्टार एअर सेवेच्या माध्यमातून एकमेकांशी जोडली जातील, असा विश्वास स्टार एअरचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक संजय घोडावत यांनी व्यक्त केला आहे.
हुबळी येथे बसवराज बोम्मई यांच्याशी कर्नाटकातील उद्योग क्षेत्राबाबत चर्चा केल्यानंतर घोडावत बोलत होते. बसवराज मु
बोम्मई यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर उद्योजक संजय घोडावत यांनी प्रथमच त्यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले की, उद्योगपती घोडावत यांनी दोन वर्षापासून बेंगलोर, बेळगाव, गुलबर्गा व हुबळी या ठिकाणी स्टार एअर विमान सेवा सुरू केली आहे.
विमान सेवेला लागणारा देखभाल (मेंटेनन्स) विभाग बेंगलोर येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या विमानतळावर सुरू केला आहे. त्यामुळे रोजगार निर्मिती बरोबरच परकीय चलनही राज्यशासनाला मिळणार आहे.
कोरोना प्रादुर्भाव काळात संजय घोडावत यांनी बेळगाव व हुबळी या शहरांमध्ये बेघर वसाहत येथील मजुरांना दोन महिने मोफत अन्न पुरवले. वेळोवेळी डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना पीपीई कीट, फेसमास्क व सॅनिटायझर पुरवून सामाजिक हित जोपासले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री बोम्मई यांनी संजय घोडावत यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.
बसवराज बोम्मई यांच्या रूपाने राज्याला प्रामाणिक कार्यतत्पर व विशेषतः शेतकऱ्यांविषयी तळमळ असणारे मुख्यमंत्री लाभले आहेत. कोरोना काळात त्यांनी कडक निर्बंध घालून कर्नाटकाला कोरोनामुक्तीकडे नेले आहे. स्टार एअरच्या माध्यमातून आम्ही कर्नाटकातील मुख्य शहरे भारतातील मुख्य शहरांशी लवकरच जोडणारा आहोत, असे मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर बोलताना संजय घोडावत यांनी स्पष्ट केले.