शनिवारी आणि रविवारी दोन दिवस मुख्यमंत्री बसवराज बोंम्मई हे बेळगाव दौऱ्यावर असणार आहेत बेळगाव मनपा निवडणुकीत भाजपने मिळवलेल्या यशा नंतर बोंम्मई हे पहिल्यांदाच बेळगाव दौऱ्यावर येत आहेत.
मुख्यमंत्र्यांचे विशेष अधिकारी बी पी चन्नबसवेशा यांनी बोम्मई यांच्या दौऱ्याची माहिती दिली आहे.शनिवारी दुपारी 3 वाजता बंगळुरूहुन हुबळीला विमानाने येणार आहेत हुबळीहुन रोड मार्गे संकेश्वर आणि हुक्केरी दौरा करणार आहेत.
सायंकाळी 7:30 वाजता संकेश्वर नगर पंचायत नूतन कार्यालयाचे उदघाटन तसेच नवीन हायटेक बस स्थानकाचे अनावरण करणार आहेत. रात्री 8: 30 वाजता हुक्केरीबस स्थानक आणि कृषी डिप्लोमा कॉलेजचे उदघाटन करणार असून रात्री 10 वाजता बेळगावात वास्तव्य असणार आहे.
रविवारी सकाळी 9 वाजता होसून बसवणं गल्ली येथील ई ग्रंथालय उदघाटन तसेच सकाळी 9:30 महावीर भवन नूतन भाजप नगरसेवकांचा सत्कार करणार आहेत. अकरा वाजता अंगडी कॉलेज कै. सुरेश अंगडी प्रतिमेचे अनावरण करणार आहेत. दुपारी 2वाजता बेळगाव हुन गदग कडे रवाना झाले आहेत.