बेळगाव शहरातील गव्हर्मेंट सिटी लायब्ररीचे हायटेक डिजिटल लायब्ररीमध्ये रुपांतरीत करण्यात आले आहे. या रवींद्र कौशिक गव्हर्मेंट हायटेक डिजिटल सिटी लायब्ररीचे लवकरच उद्घाटन केले जाणार आहे.
बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडने बँक ऑफ इंडिया शहापूर येथील गव्हर्मेंट सिटी लायब्ररी अर्थात सरकारी शहर ग्रंथालयाचे 2.5 कोटी रुपये खर्च करून हायटेक डिजिटल लायब्ररीमध्ये रुपांतर केले आहे.
या लायब्ररीला भारताचे सर्वश्रेष्ठ हेर रवींद्र कौशिक यांचे नांव देण्यात आले आहे. भारताच्या रिसर्च अँड ॲनालिसिस विंग (राॅ) या गुप्तचर संघटनेचे रवींद्र कौशिक के सदस्य होते.
भारताचे सर्वोत्तम हेर असणारे कौशिक हे एकमेव भारतीय हेर आहेत की ज्यांनी पाकिस्तानी लष्करात उच्चपदस्थ अधिकारी राहून भारतासाठी काम केले. ‘राॅ’ साठी त्यांनी 1979 ते 83 या कालावधीत पाकिस्तान विरुद्ध हेरगिरी केली.
शहापूर येथील सरकारी सिटी लायब्ररीचे हायटेक डिजिटल लायब्ररीमध्ये रूपांतर करताना याठिकाणी सेंट्रल लायब्ररीच्या सर्व्हरशी संलग्न ऑल-इन-वन डेस्कटॉपसह सीसीटीव्ही कॅमेरे, वाय-फाय यंत्रणा, 42 इंची एलईडी टीव्ही, ई-बुक (अनलिमिटेड ऑफलाइन डाऊनलोडची सोय), ऑनलाइन -ऑफलाइन मासिकांचे भंडार, हिंदी इंग्रजी कन्नड मराठी व उर्दूतील संज्ञानात्मक भाषा शिक्षण, स्मार्ट ई-बुक्स आदी विविध आधुनीक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.