पोलीस उपायुक्त विक्रम आमटे यांच्या पुढाकारातून बेळगाव पोलीस आयुक्तालयाच्या वतीने माध्यम आणि कायदा या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली.
उद्यमबाग येथील शगुन गार्डनमध्ये आयोजित ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सोशल मीडिया, मुद्रित माध्यमांचे प्रतिनिधी आणि पोलिसांचा सहभाग होता.आर एल लॉ कॉलेजचे प्रा. वाघ आणि प्राचार्य अनिल हवालदार यांनी मार्गदर्शन केले.
सोशल मीडिया आणि मुद्रित माध्यमांमध्ये काम करत असताना कायद्याचे भान असणे महत्त्वाचे असते. कायद्याचे भान नसले की प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या अनेक गंभीर प्रकार निर्माण करू शकतात. यासाठीच माध्यमांसाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
सध्या अनेक संवेदनशील घटना घडत असतात. या संदर्भात वृत्त प्रसारित करत असताना काळजी घेण्याची गरज असते. याचबरोबरीने कायदा संदर्भातील बातम्या लिहितानाही महत्वाचे आवश्यक ते संदर्भ आणि कायदा यांचा ताळमेळ घालावा लागतो .
यासाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी विशेष मार्गदर्शन करण्यात आले व उपस्थित प्रतिनिधींनी मिळालेल्या मार्गदर्शनाचा चांगला उपयोग आपल्या कामात होईल अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या.