Wednesday, December 25, 2024

/

चंदन तस्करी प्रकरणी एक जण गजाआड

 belgaum

चंदन तस्करी प्रकरणी एक जण गजाआड -बेक्केरी (ता. रायबाग) येथे डीसीआयबी पोलिसांनी बेकायदेशीररित्या चंदनाची तस्करी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एकाला अटक करून त्याच्याकडील 9 हजार रुपये किमतीचे 10 किलो चंदन जप्त केले.

महेश मार्तंड यल्लट्टी (रा बेक्केरी, ता. रायबाग) असे अटक केलेल्या आरोपीचं नांव आहे. त्याच्या विरोधात रायबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

बेक्केरी येथे एक इसम चंदनाची तस्करी करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती डीसीआयबीचे पोलीस निरीक्षक बसनगौडा पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार काल मंगळवारी त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह छापा टाकून उपरोक्त कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.