व्हॅक्सिन डेपो विकासाच्या मुद्द्यावर पर्यावरणी न्यायालयात गेले आहेत. या संदर्भात न्यायालयाने डेपोतील विकास कामांना स्थगिती आदेश दिला आहे.
या संदर्भातील सुनावणीदरम्यान स्मार्ट सिटी च्या अधिकाऱ्यांनी या जागेत आपल्याला 93 हजार झाडे लावायची आहेत त्यामुळे स्थगिती उठवावी. अशी मागणी केली आहे.
यावर मुद्दा मांडताना याचिकाकर्त्यांनी डेपोत एक एकर जागा शिल्लक आहे तेथे 300 झाडे लावता येतात. तर 93 हजार झाडे कशी लावली जाणार असा मुद्दा उपस्थित केला.
दरम्यान न्यायालयाने हा प्रकार लक्षात आला असून काही झाडे लावण्यास परवानगी देऊया असे न्यायालयाने म्हटले आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पालाही पर्यावरणाची काळजी आहे असे दाखवण्यासाठी झाडे लावण्याचा मुद्दा पुढे आणण्यात आला आहे.
93 हजार झाडे लावणार यामुळे इतर विकास कामे करण्याला परवानगी मिळेल अशी शक्यता निर्माण करून झाडे लावण्याचा मुद्दा न्यायालयात उपस्थित करण्यात आला असल्याची माहिती मिळाली असली तरी न्यायालयाने ही स्थगिती कायम ठेवून पर्यावरणींना दिलासा दिला आहे.