माझ्या अडीच वर्षाच्या मुलीला दोन्ही कानांनी ऐकू येत नसून सर्वसामान्य मुलांप्रमाणे जीवन जगता यावे यासाठी तिच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला असून यासाठी 17 लाख 32 हजार 500 रुपये इतका खर्च येणार आहे. शस्त्रक्रिया व उपचाराचा हा मोठा खर्च माझ्या आवाक्याबाहेर असल्यामुळे कृपया दानशूर व्यक्ती आणि संघ -संस्थांनी मदत करून सहकार्य करावे, असे आवाहन शिवाजीनगर येथील नितीन अशोक रेडेकर यांनी केले आहे.
फर्स्ट लेन, तिसरा क्राॅस शिवाजीनगर येथील नितीन अशोक रेडेकर यांची अडीच वर्षाची मुलगी जानव्ही ही कर्णबधिर आहे. दोन्ही कानांनी तिला ऐकू येत नसल्यामुळे डॉक्टर आणि तिच्यावर ‘क्लॉक्लियर इम्प्लांट’ ही कानावरील शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला आहे.
सर्वसामान्यांप्रमाणे जीवन जगण्यासाठी आणि सर्वसामान्य मुलांप्रमाणे शिक्षण घेण्यासाठी जानव्हीवर तातडीने सदर शस्त्रक्रिया होणे गरजेचे आहे. मुंबईच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये सदर शस्त्रक्रिया उपलब्ध असून त्यासाठी 17 लाख 32 हजार 500 रुपये खर्च येणार आहे.
हा खर्च नितीन रेडेकर यांच्या आवाक्याबाहेर आहे. तेंव्हा जानव्हीला सर्वसामान्य मुलांप्रमाणे जीवन जगण्याची आणि शिक्षण घेण्याची संधी मिळावी यासाठी दानशूर व्यक्ती आणि सेवाभावी संघ -संस्थांनी तिच्यावरील उपचारासाठी आपल्यापरीने शक्य होईल तितकी मदत करावी, असे कळकळीचे आवाहन नितीन रेडेकर यांनी केले आहे.
तसेच आर्थिक मदत व्हर्चुअल एसी नंबर : 6999413500499080, व्हर्च्युअल नेम : नितीन रेडेकर किट्टो, आयएफएससी : YESB0SCMSNOC (यामध्ये ‘बी’ नंतर ‘ओ’ नसून ‘शून्य’ आहे.) याठिकाणी करावी, अशी विनंतीही केली आहे.