नागुर्डा ता. खानापूर येथील मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंट चे जवान संतोष नामदेव कोलेकर यांचा पुणे येथील रेजिमेंटच्या इस्पितळात रविवार दि.१९ रोजी दुपारी ३ आकस्मिक मृत्यू झाला.
कै. नामदेव कृष्णा कोलेकर गुरुजी (मूळचे कौंदल गावाचे)हे संतोष यांचे वडील. संतोष यांचे प्राथमिक शिक्षण नागुर्डा येथील मराठी शाळेत झाले, तर माध्यमिक शिक्षण मराठा मंडळ कानसुली हायस्कुल येथे झाले. दि.२५ एप्रिल २००३ रोजी ते बेळगावच्या १७ मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंट मध्ये ते भरती झाले होते.
आपल्या १८ वर्षाच्या सेवेत त्यांनी जम्मू -काश्मीर, लेह-लडाख, आसाम-नागालँड, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, नेपाळ, बंगाल, राजस्थान, गुजराथ आदी ठिकाणी देशसेवा बजावली. सेवेत असताना सोमवार दि १९ रोजी दुपारी ३च्या सुमारास तत्यांचा आकस्मिक मृत्यू झाला.
संतोष यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, भाऊ असा परिवार आहे. मंगळवार दि २० रोजी दुपारी नागुर्डा येथे रेजिमेंटच्या इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.