बेळगावातील कन्नड संस्थांकडून त्या कन्नड अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला आहे. विसर्जनावेळी फक्त कन्नड भाषेत फलक लावून कन्नड भाषेचा दुराभिमान दाखवल्याबद्दल की मराठीला डावलून मराठी भाषिकांचा अपमान केल्याबद्दल हा सत्कार झाला असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कन्नड संघटनेच्या नेत्यांनी आज बेळगावातील गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान मनपाच्या व्यासपीठावर फक्त कन्नड बॅनर लावणाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कार केला.
यावेळी मनपा आयुक्त रुद्रेश घाळी यांनी कन्नड भाषेचा बॅनर व्यासपीठावर लावण्यासाठी कष्ट घेतले होते. गणेश विसर्जनाच्या वेळी कपिलेश्वरच्या तलावाशेजारी हा बॅनर बांधण्यात आला होता.
अनावरण केलेल्या बॅनर चा विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांना लक्ष्मी निप्पानीकर या महिला अधिकारी ने धारेवर धरले याबद्दल स्वतःला कन्नड सेनानी म्हणून घेणाऱ्या अशोक चंदरंगी या कन्नड नेत्याने त्यांचा सत्कार केला. कन्नड सक्ती करण्याच्या या प्रयत्नाबद्दल अधिकाऱ्यांचे विशेष कौतुक करण्यात आले.
दीपक गुडगनट्टी महादेव तलवार यांच्यासह इतर कन्नड संघटनांचे नेते यावेळी उपस्थित होते. एकीकडे सीमाभागात मराठी भाषिकांना आम्ही सन्मानाचे जगणे देतो असे सांगण्यात येत असताना आता कन्नड संघटना,त्यांचे अधिकारी यांचा खरा चेहरा या पद्धतीने उघड होऊ लागला आहे.