Wednesday, December 4, 2024

/

केएसआरपी जवानांचा दिक्षांत समारंभ दिमाखात

 belgaum

बेळगाव शहरानजीकच्या कंग्राळी खुर्द येथील कर्नाटक राज्य राखीव पोलिस दलाच्या (केएसआरपी) प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 171 सशस्त्र पोलिस कॉन्स्टेबलचा दिक्षांत समारंभ आज बुधवारी मोठ्या दिमाखात पार पडला.

कंग्राळी खुर्द येथील कर्नाटक राज्य राखीव पोलिस दलाच्या (केएसआरपी) प्रशिक्षण केंद्राच्या परेड ग्राउंडवर आयोजित सदर दीक्षांत समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे गृहमंत्री अरग ज्ञानेन्द्र हे उपस्थित होते.

प्रारंभी स्वागत आणि प्रास्ताविक झाल्यानंतर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 171 सशस्त्र पोलीस कॉन्स्टेबल्सनी वाद्यवृंदाच्या तालावर शिस्तबद्ध संचलनाद्वारे प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली. त्यानंतर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या पोलिसांना त्यांच्या कर्तव्याची शपथ देवविण्यात आली.

याप्रसंगी बोलताना प्रमुख पाहुणे गृहमंत्री अरग ज्ञानेन्द्र यांनी देशातील नागरिकांच्या संरक्षणाचे कार्य पोलीस करतात देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या जवानांना प्रमाणेच देशांतर्गत समाजाचे संरक्षण करणाऱ्या पोलिसांचे काम अतुलनीय आहे.Ksrp

प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 171 पोलिसांना उत्तम प्रशिक्षण मिळालेले आहे, तेंव्हा त्यांनी भविष्यात देशभक्ती जागृत ठेवून प्रामाणिकपणे आपली सेवा बजावण्याद्वारे आपल्या खात्याचा नांवलौकिक वाढवावा असे सांगून प्रशिक्षण पूर्ण केलेल्या पोलिसांना सदिच्छा दिल्या.

यावेळी कर्नाटक राज्य राखीव पोलीस दलाचे एडीजीपी अलोक कुमार यांनीदेखील समयोचित विचार व्यक्त केले. त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 171 जवानांनी केलेल्या पथसंचलनाचे विशेष कौतुक केले. तसेच भविष्यात या जवानांनी आपले कर्तव्य व्यवस्थित पार पाडावे यासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी प्रशिक्षणादरम्यान उत्तम कामगिरी करणाऱ्या निंगाप्पा माणगावी, श्रीधर कोटी, विशाल कत्ती, चंदन ए. सी., मल्लिनाथ जमादार, धर्मेश, रामोत्तर कोलकार या प्रशिक्षणार्थी पोलिसांना विशेष प्रशस्ती आणि करंडक देऊन गौरविण्यात आले.

समारंभास बेळगावचे पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी आदींसह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि निमंत्रित उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.