अथर्व मेडिकल एड फाउंडेशन तर्फे नव्याने सुरुवात करण्यात आलेल्या डायग्नोस्टिक लॅबचे लॉन्चिंग रविवारी सोमवार पेठ टिळकवाडीत करण्यात आले. आयसीएमआर चे सायंटिस्ट आणि संचालक डॉ. देवप्रसाद चटोपाध्याय यांच्या हस्ते लॅबमधील अद्ययावत उपकरणांचे लॉन्चिंग करण्यात आले.
त्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात डॉक्टर देवप्रसाद चट्टोपाध्याय यांनी मार्गदर्शन केले. ‘अशा पद्धतीच्या डायग्नोस्टिक सेंटर ची देशाला गरज असून या लॅब मुळे गरजू रुग्णांना मोठी मदत होणार आहे. अथर्व ने हा एक चांगला उपक्रम सुरू केला आहे’ असे यावेळी बोलताना ते म्हणाले
‘नागरिकांचा अथर्ववर, अथर्वने आजवर केलेल्या कामांवर विश्वास आहे. त्या विश्वासाच्या जोरावर मोठी मोठी कामे केली जाऊ शकतात. यासाठी हा विश्वास कायम वृद्धिंगत करावा’. असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
प्रारंभी अथर्व मेडिकल एड फाउंडेशनचे चेअरमन विजय पाटील यांनी स्वागत करून डायग्नोस्टिक सेंटर चा उद्देश सांगितला. यानंतर अथर्व ला मदत करणाऱ्या देणगीदारांचा पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.मान्यवरांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. संचालक शिरीष मालू यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. व्यासपीठावर अथर्व डायग्नोस्टिक सेंटर चे चेअरमन डॉ.श्रीकांत विरगे ,व्हाईस चेअरमन नितीन कपीलेश्वरकर, संतोष चांडक व इतर मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाला बेळगाव शहर आणि परिसरातील विविध उद्योजक आणि मान्यवरांनी उपस्थिती दाखवली होती. कार्यक्रमात अनेकांनी देणगी देऊन अथर्वच्या डायग्नोस्टिक सेंटरच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.