विजापूर जिल्ह्यात सर्वत्र होत असलेल्या संततधार पावसामुळे नदीनाले दुथडी भरून वाहत आहेत. या जिल्ह्यातील डोणी नदीला आलेल्या
पुरात नदी ओलांडताना एकजण वाहून गेला आहे.
विजापूर जिल्ह्यातील तालिकोटी शहरातील ५० वर्षीय इब्राहिम बेपारी असे वाहून गेलेल्या व्यक्तीचे नाव आहे. दुथडी भरून वाहणारी डोणी नदी पार करण्याच्या प्रयत्नात तो अचानक वाहून गेला. इब्राहिम बेपारी हा मोटारसायकलवरून हाडगीनाळहुन तालिकोटीला जात होता. त्यावेळी नदी भरून वाहात असल्याने एका किनाऱ्यावर त्याने मोटरसायकल थांबवली आणि दुसऱ्या किनाऱ्यावर चालत जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अचानक तो पाण्यात वाहून गेला.
याची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी
व पोलिसांनी धाव घेऊन त्याचा शोध घेतला. पण बेपारी आढळून आला नाही. तालिकोटी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.
सध्या राज्यातील काही जिल्ह्यात पावसाचे प्रमाण वाढत चालले आहे. अशा परिस्थितीत नद्या नाले भरलेले असताना व पुलावरून पाणी जात असल्यास खबरदारी घेण्याची गरज व्यक्त होत आहे.