मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या मंत्रिमंडळाने कोविड -19 च्या निकषांचे काटेकोरपणे पालन करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अध्यक्ष, महापौर, अधिकारी पदाच्या निवडणुका घेण्यास हिरवा कंदील दर्शविला आहे.
अनेक ग्रामपंचायती, टीपी, नगर पंचायत, नगर निगम यांनी अलीकडेच त्याचे सदस्य निवडले आहेत,.
स्थानिक संस्थांना लोकनियुक्त प्रतिनिधींच्या हाती सोपवण्यासाठी संस्थांच्या प्रमुखांना नियुक्त करण्याच्या निवडणूका लवकरच आयोजित केल्या जातील. अशी माहिती देण्यात आली आहे.
गेल्या 3 सप्टेंबर रोजी बेळगाव मनपाची निवडणूक झाली त्याचा निकाल आला होता महापौर उपमहापौर पदाचे आरक्षण देखील जाहीर झाले होते आता महापौर निवडणुकीची घोषणा कधी होते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.