बेळगाव जिल्हा आपत्ती निवारण समितीच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांनी नवीन कोविड मार्गदर्शक सूची लागू केली आहे.
सार्वजनिक कार्यक्रम करण्यासाठी 400 लोकांना एकत्रित येण्यासाठी अनुमती दिली आहे. डी सी एम जी हिरेमठ यांनी याबाबत नवीन आदेश काढला आहे.
बेळगावात वाढत्या कोरोना रुग्णावर नियंत्रण आणण्यासाठी सदर नियम लागू करण्यात आला आहे. केवळ चारशे जण सार्वजनिक कार्यक्रमात एकत्रित येऊ शकतात कोरोनाचे नियम पाळणे बंधनकारक असणार आहे.
कुणीही या आदेशाचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा देखील जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी दिलाय
पर्यटन स्थळा वरील हटवली बंदी
कोरोना नियंत्रण समितीच्या मार्गदर्शनानुसार बेळगाव जिल्ह्यातील पर्यटन स्थळावर जाण्यासाठी बंदी हटवली आहे.अलीकडे जिल्ह्यातील प्रमुख मंदिरे सुरू करण्याचा आदेश बजावण्यात आला होता त्यानंतर आता बेळगाव जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळे देखील खुली करण्यात आली आहे.