कर्नाटक राज्य सरकारने गणेशभक्तांच्या भावनांचा विचार करून फक्त पाच दिवसांचा सार्वजनिक गणेशोत्सव करण्यास परवानगी दिली आहे. या पाच दिवसात सार्वजनिक मंडप उभारून गणेशोत्सव साजरा करता येणार आहे.
गणेशाची पूजा आणि आराधना करता येणार आहे. मात्र अनेक नियमांचे बंधन गणेश भक्तांवर असणार आहे. प्रत्येक गणेश मंडपात नियम पाळण्याची सूचना सरकारने केली आहे. या वेळी गणेशोत्सव कोणत्याही परिस्थितीत करणारच असा निर्णय गणेशभक्तांनी घेतल्यानंतर सरकारने यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी आज 5 सप्टेंबर रोजी एक विशेष बैठक घेतली.
त्या बैठकीत हा पाच दिवसांचा गणेशोत्सव साजरा करण्याची परवानगी राज्यभरात देण्यात आली आहे. आता गणेशोत्सव संदर्भात भाविकांची भूमिका काय असणार सरकारचा आदेश मानणार का किंवा या संदर्भात आणखी काही मागणी व निवेदने दिली जाणार का हे पुढील काळात स्पष्ट होणार आहे.
दहा दिवसांचा उत्सव करण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी कर्नाटकातील सर्वच भागातील भाविकांनी मोठ्या प्रमाणात केली होती, मात्र कर्नाटक सरकारने कोरोनाचे कारण दाखवून फक्त तीन दिवसात गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन केले आहे.
शाळा कॉलेज मधून गणेश उत्सवाचे कार्यक्रम होणार नाहीत तर गणेश उत्सव काळात मनोरंजन कार्यक्रम देखील करता येणार नाहीत असे मंत्री आर अशोक यांनी म्हटलं आहे.रात्री 9 नंतर गणेश पूजन होणार नसून उत्सवाच्या दरम्यान लसीकरण सक्तीचे करण्यात आले आहे.