ऑपरेशन कमळ दरम्यान मला पैश्याची ऑफर देण्यात आली होती या माजी मंत्री श्रीमंत पाटील यांच्या वक्तव्या बद्दल के पीसी सी अध्यक्ष डी के शिवकुमार यांनी प्रतिक्रिया दिली असून श्रीमंत पाटील यांचे धाडसाने बोलल्या बद्दल अभिनंदन केले आहे.
पाटील यांनी काल काँग्रेस सोडून भाजपात येण्यासाठी मला भाजपकडून हवे तेवढे पैसे देतो अशी ऑफर आली होती मात्र मी ते पैसे घेतले नाहीत असे म्हटले होते.त्यानंतर राजकीय गोंधळ उडाला होता त्यावर डी के शिवकुमार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
या भाजपच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची दखल एसीबी घेत स्वयंप्रेरित होऊन गुन्हा नोंद करावा असे म्हटले आहे.भाजपच्या भ्रष्टाचार शुद्ध प्रशासनाच्या निव्वळ गोष्टी करत असते हे यावरून स्पष्ट होते असे ते म्हणाले.
केपीसीसी अध्यक्ष डीके शिवकुमार रविवारी बेळगावात दाखल झाले. शहरातील नवनिर्वाचित काँग्रेस नगरसेवकांशी त्यांनी सल्लामसलत केली. रविवारी दुपारी डिकेशी शहरातील काँग्रेस हाऊसमध्ये पोहोचले होते
निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांशी सल्लामसलत करणाऱ्या डिकेशीनी काँग्रेसच्या नेत्यांशीही या धक्क्याबाबत चर्चा केली. डीके शिवकुमार बेळगाव काँग्रेसमधील दोन गटांच्या राजकारणात मध्यस्ती शक्यता आहे.
बेळगाव महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला बसलेला धक्का मोठा आहे. त्या पार्श्वभूमीवर डीके शिवकुमार आणि काँग्रेसच्या दोन्ही गटांशी चर्चा सुरू केली आहे नगरसेवकांशी चर्चा करून आणि यापुढील महानगरपालिकेतील धोरणे कशी असते त्या संदर्भात मार्गदर्शन केले.