Saturday, December 21, 2024

/

घ्या कुकर, साड्या, पैसे घाला मतं : बॅनर चर्चेत

 belgaum

निवडणुकीपूर्वी भरमसाठ आश्वासने देऊन नंतर त्याकडे पाठ फिरवणाऱ्या नेत्यांची या देशात कमतरता नाही मतांचा जोगवा मागण्यासाठी मतदारांच्या दारी येऊन मताची याचना करणारे नेते नंतर मात्र मतदारांच्या सर्व मागण्यांकडे साफ दुर्लक्ष करून त्यांची बोळवण करतात. याचेच प्रत्यंतर आलेल्या मतदारांनी ग्रामीण भागात भागात उपरोधिक बॅनर्स लावून आपला संताप व्यक्त केला. हे बॅनर आज दिवसभर चर्चेचा विषय झाले होते.

साड्या, कुकर, पैसे घेऊन ज्यांना तुम्ही मत घातले त्यांनी तुमचा समस्यांकडे साफ दुर्लक्ष केले अशा आशयाचे हे बॅनर्स आहेत. सध्या ग्रामीण भागातील रस्त्यांची वाट लागली आहे.

रस्ता पक्का करावा अशी मागणी करत असूनही लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केल्याची प्रतिक्रिया या बॅनर्सद्वारे उमटली आहे. घ्या अजून कुकर आणि सडा साड्या घ्या पैसे आणि घाला मत असा मजकूर लिहिलेली कन्नड व मराठी भाषेतील बॅनर्स सध्या ग्रामीण भागात चर्चेचा विषय झाली आहेत.Banner

घ्या अजुन कुकर आणि साड्या, घ्या पैसे आणि घाला मत आणि खड्डे पण बोनस म्हणून मिळणारच, पडा आणि कंबर मोडून घ्या. 30 टक्के कमिशन घेऊन आक्का रस्ते करुले म्हणे.. मग रस्ते बाद होणारच बसा बोंबलत.

आक्का पैसे घेऊन फॉर्मात आणि तुम्ही कंबर मोडून घेऊन घरात – मी आपलाच सुज्ञ नागरिक, अशा आशयाचा मजकूर संबंधित बॅनरवर आहे. बॅनरवरील या मजकुराची बेळगाव ग्रामीणमध्ये सध्या चवीने चर्चा होत आहे. दरम्यान, कोणी अज्ञातांनी लावलेले हे बॅनर एका पक्षाच्या कार्यकर्त्याने लगेच हटवून आपली निष्ठा व तत्परता दाखविली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.