महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीला उद्या सकाळी आठ सुरुवात होणार आहे.मतमोजणी एन एस पै प्राथमिक शाळेच्या तळमजला, पहिला मजला आणि दुसऱ्या मजल्यावर मतमोजणी होणार आहे. एकूण बारा खोल्यांची व्यवस्था मतमोजणीसाठी करण्यात आली आहे. एका वेळी बारा खोल्यांमध्ये मतमोजणी होणार आहे.
खोली 2 तळ मजला – वार्ड क्रमांक 18,19,25,26,45,
खोली 3- तळ मजला- वार्ड क्रमांक 1,2,5,6,8
खोली 11-तळमजला वार्ड क्रमांक 15,16,22,23,24
खोली 10 तळमजला- वार्ड क्रमांक 3,4,7,9,10
खोली 16 पहिला मजला – वार्ड क्रमांक 17,31,32,33,34
खोली 15 पहिला मजला- वार्ड क्रमांक 14,35,38,48,55
खोली 20-पहिला मजला – वार्ड क्रमांक 52,53,54,57,58
खोली 19, पहिला मजला – वार्ड क्रमांक 11,36 आणि 47
खोली 27- दुसरा मजला-वार्ड क्रमांक 40,41,49,50,51
खोली 26 दुसरा मजला- वार्ड क्रमांक 21,27,28,39,56
खोली 28, दुसरा मजला- वार्ड क्रमांक 12,13,20,37 आणि 46,
खोली 29 – दुसरा मजला – वार्ड क्रमांक 29,30,42,43 आणि 44
एका उमेदवारांच्या दोन एजंटना मतमोजणी प्रवेश दिला जाणार आहे. बी के मॉडेल मैदानावर उमेदवार आणि एजंट आसनासाठी पेंडालची सोय करण्यात आली आहे.
58 वार्डाचें निकाल आल्या नंतरच विजेत्या उमेदवाराना प्रमाण पत्र दिले जाणार आहे.415 मतमोजणी यंत्रे असून 12 सहाययक निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती मतमोजणीसाठी करण्यात आली आहे.सकाळी 7:30 वाजता स्ट्रॉंग रूम खोलण्यात येणार असून 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे.