Friday, April 26, 2024

/

मनपा निवडणुकीलाच खेचणार कोर्टात

 belgaum

बेळगाव महानगरपालिका निवडणूक प्रक्रिया अजिबात पारदर्शक झाली नाही .यासंदर्भात पराभूत उमेदवारांची एकमत झाले आहे. त्यांनी या एकंदर प्रक्रिया विरोधात न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.
पराभूत उमेदवार यांच्या तक्रारी हेल्प डेस्क च्या माध्यमातून एकत्रित केल्या जाणार आहेत. या नंतर न्यायालयात धाव घेतली जाणार आहे.

सोमवारी महानगरपालिका निवडणुकीचा निकाल लागला. या निकालानंतर अनेकांना धक्का बसला आहे.अनपेक्षित असा विचित्र निकाल बाहेर पडला. यामुळे पराभूत उमेदवार एकत्र आले.

त्यांनी सोमवारी रात्रीच जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेऊन निवडणूक प्रक्रिया पारदर्शक नसून रद्द करा अशी मागणी केली. मात्र यासंदर्भात ठोस काही कळले नाही. बुधवारी एकत्रित बैठक घेऊन या विरोधात न्यायालयात दावा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.Meeting ex corp

 belgaum

निवडणूक प्रक्रियेवर आवाज उठवण्याचा हा प्रकार पहिल्यांदाच बेळगाव घडत असेल. त्या संदर्भात न्यायालयीन लढा कसा होणार यावर पुढील स्वरूप ठरणार आहे.मंगळवारी मराठा मंदिरात बैठक झाली अपक्ष, समिती आणि आप सह शेकडो उमेदवार या बैठकीला उपस्थित होते.

व्ही व्ही पॅट शिवाय मतदान घेणे, ए व्ही एम मशीनचा डेमो न घेणे अश्या तक्रारीं उमेदवारांनी केल्या त्यावर मराठा मंदिरात डेस्क उभारून तक्रार अर्ज घेतले जाणार असून त्यानंतर न्यायालयात धाव घेतली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.