गेल्या चार दिवसापासून बेळगावात ढगाळ वातावरण जरी अनुकूल असले तरी सर्दी आणि लहान आजारांना आमंत्रण मिळत आहे. या वातावरण ढगाळ असले तरी हवेत गारठा आहे तुरळक पाऊस होत आहे. पावसाचा कोंडा पडत आहे कुंद वातावरण सगळीकडे झालेलं आहे . साचलेपण सगळीकडे पसरलेल आहे. डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे.
बेळगावसह राज्याच्या उत्तर भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अॅलर्ट घोषित करण्यात आले आहे. शिवाय किनारपट्टीवर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. बेळगावसह बागलकोट, बिदर, गुलबर्गा, गदग, कोप्पळ, रायचूर, विजापूर, यादगिरी आदी जिल्ह्यांमध्ये जोरदार वृष्टीचा अंदाज आहे.
कारवार, मंगळूर, उडपी जिल्ह्यांमध्येही पावसाची शक्यता आहे. दक्षिण भागातील बळ्ळारी, बंगळूर ग्रामीण, बंगळूर शहर, चिक्कमगळूर, हासन, कोडगू, कोलार, म्हैसूर, रामनगर, शिमोगा येथे साधारण पावसाचा अंदाज आहे.