Sunday, September 22, 2024

/

लवकरच सुरू होणार निकालाची प्रक्रिया

 belgaum

बेळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीला लवकरच सुरुवात होणार आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून एन एस पै प्राथमिक शाळेमध्ये मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

मतमोजणीची तयारी पूर्ण पणे सज्ज झालेली आहे. त्यामुळे लवकरात लवकर निकाल हाती येणार आहेत. संपूर्ण बेळगाव शहराचे, कर्नाटक राज्याचे आणि महाराष्ट्राचे लक्ष या निवडणुकीच्या निकालांकडे लागलेले आहे.

यापूर्वी कधीही दाखल न होणारे पक्ष या वेळी आपल्या पक्षांची चिन्हे घेऊन या निवडणुकीत दाखल झाले. त्यामुळे पक्ष निवडून येणार? पक्षांना मोठी आकडेवारी मिळणार की अस्मितेच्या मुद्द्यावर मराठी नगरसेवक मोठ्या संख्येने निवडून येणार या संदर्भातील उत्सुकता सर्वांना असून त्यामुळे आजच्या निवडणुकीच्या निकालांकडे साऱ्यांचेच लक्ष आहे.

लवकरात लवकर निकाल जाहीर होणार असून बेळगाव लाईव्ह च्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचवला जाणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.