बेळगाव तालुक्यातील मच्छे येथील रहिवाशी आणि भारतीय सैन्यात क्लार्क पदावर सेवा बजावणारे नितीन शंकर राऊत हे बेपत्ता झाले आहेत.
मच्छे येथील गोडसे कॉलनीचे रहिवासी नितीन शंकर राऊत हे भारतीय सैन्यात क्लार्क म्हणून उत्तराखंडमधील हलधोनी येथे सेवा बजावतात. १९ सप्टेंबर २०२१ रोजी ते घरातून कामाच्या ठिकाणी रुजू होण्यास निघाले होते. मात्र त्यानंतर ते बेपत्ता झाले असून, त्यांचा ठावठिकाणा समजू शकलेला नाही.
बेपत्ता झालेल्या नितीन राऊत यांची उंची ५.५ असून, शरीरयष्टी साधारण आहे. त्यांचा रंग गोरा, चेहरा उभट आणि लांब नाक आहे. ते हिंदी आणि मराठी भाषा बोलतात.
त्यांच्याबाबत काही माहिती मिळाल्यास बेळगाव रेल्वे पोलीस ठाणे दूरध्वनी क्र. ०८३१-२४०५२७३ किंवा मो. क्र. ९४८०८०२१२७ वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.