कर्नाटकात 23 ऑगस्ट पासून शाळा सुरू होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व शिक्षकांचे कोविड लसीकरण 23 पूर्वी पूर्ण करणार अशी घोषणा राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनी केली आहे.
कोविड ची तिसरी लाट आल्यास आणि मुलांना जास्तीतजास्त संसर्ग होण्याची भीती आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे, यासाठी ते प्रौढांना अर्थात शिक्षकांना लसीकरण वाढवून लहान मुलांना संसर्ग होऊ नये याची काळजी घेतली जाणार आहे.
कोविड -19 साथीच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या धोक्यादरम्यान
कर्नाटक सरकारने 23 ऑगस्टपासून नववी व दहावी पर्यंतच्या शाळा उघडण्याचा निर्णय घेतला आहे
शिक्षण विभागाने जारी केलेल्या परिपत्रकात असे म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय कोविड आढावा बैठकीत घेतलेल्या निर्णयांच्या आधारे मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात आली आहेत.