कर्नाटकातील दहावी अर्थात एस एस एल सी परीक्षेचा निकाल सोमवारी लागणार आहे. कर्नाटक प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागाने तशी घोषणा केली आहे.
माजी शिक्षणमंत्री एस सुरेशकुमार यांच्या नेतृत्वाखाली परीक्षा झाली होती तर आता नूतन शिक्षणमंत्री बी सी नागेश निकाल जाहीर करणार आहेत.
सोमवारी दुपारी तीन नंतर निकाल घोषित करण्यात येणार आहे. हा निकाल सर्वप्रथम इंटरनेटच्या माध्यमातून दिला जाणार असून त्यानंतर तो शाळेतही मिळणार आहे.
दहावीच्या मुलांना सक्षमपणे पुढील शिक्षण घेण्याची संधी मिळावी असा आगह माजी शिक्षणमंत्री सुरेशकुमार यांनी धरला त्यामुळेच बहुपर्यायी प्रश्नांवर आधारित परीक्षा घेण्यात आली होती.
विद्यार्थ्यांचे लक्ष निकालाकडे लागून राहिले आहे.
निकाल लागताच पुढील अभ्यासक्रम प्रवेशाला सुरुवात होणार असून कॉलेज मध्ये गर्दी वाढणार आहे.