Wednesday, November 20, 2024

/

*येडीयुरप्पा यांच्या कार्यकाळातील या नियुक्त्या झाल्या रद्द*

 belgaum

एकीकडे नूतन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या मंत्रिमंडळाचा उद्या बुधवारी शपथविधी होणार असल्याची माहिती समोर येत असताना दुसरीकडे माजी मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांच्या कार्यकाळातील दहा पदांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत.

येडीयुरप्पा यांचे राजकीय सचिव रेणुकाचार्य, डी एन देवराज,एन आर संतोष यांचे पद रद्द करण्यात आले आहे.

या शिवाय शिक्षण सुधारणा सल्लागार प्रा. एन आर दोरेस्वामी,सरकारचे दिल्लीचे विशेष प्रतिनिधी शंकर गौडा पाटील,येडीयुरप्पा यांचे कायदा सल्लागार मोहन लिंबीकाई,माध्यम सल्लागार एम भंगेश, सी एम यांचे ई प्रशासन सल्लागार बेळुरु सुदर्शन,माध्यम संयोजक बी एस सुनील, सी एम सल्लागार प्रशांत अशी 10 पदे रद्द करण्याचे आदेश आले आहेत.

बुधवारी दुपारी मुख्यमंत्र्यांच्या कॅबिनेटचा विस्तार होणार असून राज्यभवनात शपथविधी होणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.