राज्यात म्हैसूर येथे युवतीवर झालेल्या सामूहिक बलात्काराची घटना ताजी असताना बेळगाव जिल्ह्यात एका बालिकेवर सामूहिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना उजेडात आली आहे.
गेल्या 20 दिवसांपूर्वी बेळगाव जिल्ह्यात एका बालिकेवर सामूहिक अत्याचार झाल्याचे हिनकृत्य घडले असून बालिकेच्या पालकांनी त्या संदर्भात घटप्रभा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.
याप्रकरणी स्थापण्यात आलेल्या पोलिसांच्या विशेष पथकाने 4 आरोपींना ताब्यात घेतले आहे. पीडित 15 वर्षीय बालिका कामासाठी शेताकडे जात असताना आरोपीने तिला पकडून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचे सांगण्यात आले.
सदर बालिका ही मागासवर्गीय असल्यामुळे त्यावेळी तिच्या आईवडिलांनी आपली इभ्रत जपण्यासाठी पोलिसात तक्रार नोंदवली नव्हती.
तथापि आरोपींनी पुन्हा त्या बालिकेला त्रास देण्यात सुरुवात केल्यामुळे काल गुरुवारी तिच्या आईवडिलांनी घटप्रभा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी 4 जणांना ताब्यात घेण्यात आले असून पोलीस अधिक तपास करत आहेत.