सरकारी दवाखान्यात नर्स म्हणून सेवा बजावणाऱ्या महिलेला शाळेच्या मुख्याध्यापकांने मोबाईल द्वारे अश्लील मेसेज पाठवल्याने नर्स आणि गावातील लोकांनी मुख्याध्यापकाला चांगलाच चोप दिला.
अश्लील मेसेज पाठवणारा मुख्याध्यापक कित्तूर तालुक्यातील देगाव येथील सरकारी प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक आहे.तर महिला कित्तूर तालुक्यातील बैलुर येथे सरकारी दवाखान्यात नर्स म्हणून सेवा बजावत आहे.
मुख्याध्यापकाने अश्लील मेसेज नर्सला पाठवल्यावर सदर नर्सने ही घटना गावातील लोकांना सांगितली.घटना कळल्यावर संतप्त गावकरी आणि नर्स शाळेकडे गेले.शाळेत जावून ग्रामस्थ आणि नर्सने मुख्याध्यापकाला जाब विचारला.यावेळी नर्स आणि ग्रामस्थांनी मुख्याध्यापकाला चांगला चोप दिला.
यावेळी एका संतप्त ग्रामस्थांने मुख्याध्यापकावर खुर्ची फेकली.यावेळी सुदैवाने दुसऱ्या ग्रामस्थांनी ने खुर्ची अडकल्याने मुख्याध्यापकाला खुर्ची लागली नाही.यावेळी शाळेत आरडाओरडा आणि गोंधळ सुरू होता.अखेर मुख्याध्यापकाने माफी मागितल्यावर या प्रकरणावर पडदा पडला आहे.