Thursday, May 16, 2024

/

कर चुकवेगिरी करणाऱ्यांची गय नाही : आयुक्त नलगावे

 belgaum

करदात्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी निश्चित प्रयत्न करू, परंतु निष्कारण कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा इशारा नूतन वस्तू व सेवा कर (जीएसटी) आयुक्त बसवराज नलगावे यांनी दिला.

बेळगाव ट्रेडर्स फोरमच्या सदस्यांनी सतीश तेंडुलकर यांच्या नेतृत्वाखाली बेळगावचे नुतन केंद्रीय वस्तू व सेवा कर आयुक्त बसवराज नलगावे यांची आज बुधवारी दुपारी भेट घेऊन त्यांच्याशी जीएसटी कर प्रणाली बाबत चर्चा केली. जीएसटी आकरण्याबद्दल व्यापाऱ्यांची तक्रार नाही परंतु तो कर भरण्याची प्रक्रिया सोपी करावी, अशी मागणी सदस्यांनी केली. याशिवाय कर भरण्यास विलंब झाल्यास लेट फी लावली जाते, त्याचा परतावा जरी मिळत असला तरी तो मिळण्याचा कालावधी निश्चित नाही.

यामुळे निष्कारण व्यापाऱ्यांचे पैसे गुंतून पडतात त्यामुळे परतावा मिळण्याची ठराविक मुदत निश्चित करावी, अशी मागणी करण्यात आली. ऑनलाईन जीएसटी भरताना वारंवार लॉगिन करावे लागते. त्यामुळे वेळेचा अपव्यय होतो. याला कमी क्षमतेचा सर्व्हर कारणीभूत असल्यामुळे हाय कॅपॅसिटी सर्व्हरची सुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे, याकडे नलगावे यांचे सदस्यांनी लक्ष वेधले.Satish tendulkar

 belgaum

जीएसटीआर -1 फॉर्म अपलोड केल्यानंतर त्याचे फायलिंग होण्यासाठी आणि पडताळणीसाठी तब्बल 2 -3 तासाचा कालावधी लागतो. परंतु इतके होऊनही कांही क्षुल्लक कारणास्तव फॉर्म रद्द ठरवला जातो. परिणाम निष्कारण याचा फटका व्यापारी व उद्योजकांना बसतो. यासाठी जीएसटीआर -1 फॉर्म जोपर्यंत भरला जात नाही तो पर्यंत जीएसटीआर -3 बी फॉर्म कार्यान्वित करू नये, अशी मागणीही बेळगाव ट्रेडर्स फोरमच्या सदस्यांनी केली.

जीएसटी कराच्या बाबतीत कांही सूचना अथवा समस्या असतील तर त्यासाठी माझ्या कार्यालयाची द्वारे खुली आहेत. करदात्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करू, परंतु कर भरण्यास हेतुतः वेळ लावणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असेही आयुक्त बसवराज नलगावे यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी सतीश तेंडुलकर यांच्यासह सेवंतीलाल शाह, विकास कलघटगी, सीए वीरसिंग भोसले, राजेंद्र जोशी आदी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.