बेळगाव महानगरपालिका निवडणुकीची अधिसूचना जारी झाली असली तरी सोमवारी पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही. उद्यापासून अर्ज भरणा प्रक्रिया जोरात सुरू होणार आहे.
आजचा दिवस उमेदवारांनी पूर्वतयारीत घालवला आहे. मनपा निवडणुकीवर न्यायालय काय निर्णय देते याकडे उमेदवारांचे लक्ष लागले होते.
सुनावणी झाली नाही तारीख पुढे गेली आणि दुसरीकडे अधिसूचना जारी झाली आणि तयारीला सुरुवात झाली आहे. आता मंगळवार पासून अर्ज भरणा प्रक्रिया सुरू होणार आहे.
मनपा निवडणुकी साठी इच्छूकांची संख्या वाढत आहे. आता उद्यापासून किती अर्ज दाखल होतात यावरून निवडणुकीची चुरस वाढत जाणार आहे.
अधिसूचना जाहीर
जिल्हाधिकारी एमजी हिरेमठ यांनी सोमवारी (16 ऑगस्ट) बेळगाव मनपाच्या निवडणुकीची घोषणा केली.
23 ऑगस्ट हा नामांकनाचा शेवटचा दिवस आहे.
नामांकन मागे घेण्यासाठी 24 तारीख अंतिम असून शेवटच्या दिवशी नामांकनांची छाननी केली जाणार आहे
3 सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे.
मतमोजणी 6 सप्टेंबर रोजी होईल असे जिल्हाधिकारी एमजी हिरेमठ यांनी अधिसूचनेत म्हटले आहे.
***