कोविड संदर्भातील नियम आणि महाराष्ट्र कर्नाटक प्रवास संदर्भात सरकारी मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्याची सूचना जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांनी केली आहे.महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या सर्वांना कोरोना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक असून या चाचणी शिवाय कुणालाही प्रवेश दिला जाऊ नये असा आदेश त्यांनी दिला आहे.
जिल्हाधिकारी एमजी हिरेमठ यांनी अधिकाऱ्यांना कोविड संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी कठोर मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.
रविवारी त्यांनी बेळगाव आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवरील कोगनोळी चेकपोस्टला भेट दिली आणि आंतरराज्य प्रवासी तपासणी यंत्रणेची पाहणी केली.
बेळगाव सीमावर्ती जिल्हा असल्याने, शेजारच्या महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांनी कोविडी तपासणी आरटी-पीसीआर निगेटिव्ह रिपोर्टचे पालन केले पाहिजे. आंतरराज्यीय प्रवाशांच्या चेक पोस्टवर लक्ष ठेवले पाहिजे. त्यांनी चेक पोस्टवरील नियुक्त आरोग्य विभाग आणि पोलीस कर्मचाऱ्यांना सांगितले की तपासणी सरकारी मार्गदर्शक तत्त्वांनुसार केली पाहिजे.
जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांनी प्रवासी कोविड अहवालाच्या संदर्भात ठेवलेल्या रजिस्टर आणि इतर कागदपत्रांचीही तपासणी केली.