विद्यानगर बोगूर येथे खानापूरच्या आमदार डॉ अंजली हेमंत निंबाळकर यांनी इलेक्ट्रीकल लाईन चे भूमिपूजन केले
बोगूर गावात विद्यानगर भाग आहे, साधारण तिथे ७०-७२ घरे कित्येक दशकापासून अंधारात जीवन जगत आहेत,
दुंडय्या यादवाड यांच्या घरापासून ते अशोक आडवीअप्पा हर्कड्ली ते विठ्ठल निकांत खंडोजी यांच्या घरापर्यंत … असा हा विद्यानगर चा परिसर अंधारात असतो .
खानापूरच्या आमदार अंजली निंबाळकर यांनी गेल्या दोन महिन्यात हे काम हेस्कॉमला सांगून मंजूर करून घेतले व या कामाचे भूमीपूजन करण्यात आले.
या भागाला विद्युत जोडणी करण्यास साधारण ५२ खांबे लागणार आहेत व हे काम दोन आठवड्यात पुर्ण होऊन बोगूर ची विद्यानगरी प्रकाशमान होईल व अंधाराचे साम्राज्य नष्ट होणार आहे.
इंदिरानगर हलकर्णी , वाजपेयीनगर खानापूर व नंतर आता विद्यानगर बोगूर एकेक करून तालुक्यातील आज पर्यंत कधीही न झालेली किंवा कायम अंधारात असणारी ही गावे प्रकाशमय करण्याचे काम सुरू आहे.