बसवराज बोंम्मई मंत्रिमंडळाचा शपथविधी होऊन दोन दिवस उलटले तरी खातेवाटप झालं नव्हतं अखेर नव्याने मंत्री पदाची शपथ घेतलेल्या मंत्र्यांना खाते वाटप केले असून बेळगाव जिल्ह्यातील मंत्री उमेश कत्ती यांना वन आणि अन्न नागरी पुरवठा मिळाले आहे तर शशिकला जोल्ले यांच्याकडे कामगार आणि वाफ हाज खाते देण्यात आले आहे.
उमेश कत्ती यांच्याकडे मागील कार्यकाळात आहार अन्न नागरी पुरवठा हे खाते होते यावेळी त्याचा बदल झाला नसून त्यांना वन खाते अधिक मिळाले आहे.शशिकला जोल्ले यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला असला तरी त्यांच्याकडुन महिला बाल कल्याण काढून घेत कामगार वफ हाज खाते सोपवण्यात आले आहे.
गोविंद कारजोळ यांच्याकडे मागील कार्यकाळात महसूल खाते होते ते बदलून त्यांना जल संपदा खाते बहाल करण्यात आले आहे.विशेष म्हणजे जलसंपदा खाते आणि बेळगावचे पालकमंत्री पद रमेश जारकीहोळी यांच्याकडे होते त्यावर कारजोळ यांची वर्णी लागली आहे.
माझ्या विरोधात षड्यंत्र- जोल्ले
दरम्यान मंत्री शशिकला जोल्ले यांनी शुक्रवारी बेळगावला भेट दिली त्या दरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषी स्वागत केलं. अंडी ठेकेदार कडून कोट्यवधी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.
मी कोणतीही चूक केलेली नाही ठेकेदाराकडून कधीच पैसे मागितले नाही माझ्या हित शत्रू कडून झालेलं माझ्या विरोधातील हे षड्यंत्र आहे असे त्या यावेळी म्हणाल्या.