मनपा निवडणुकीच्या अर्ज भरणा प्रक्रियेला अद्याप म्हणावी तितक्या संख्येने सुरुवात झालेली नाही. आज तिसऱ्या दिवशी केवळ सात अर्ज दाखल झाले असून एकूण वॉर्डाची संख्या विचारात घेता दाखल होणाऱ्या अर्जांची संख्या फारच कमी असल्याचे दिसून येते .
दरम्यान उमेदवारांनी आणि त्यांच्या पक्षांनी अंतर्गत बैठका मात्र जोरात सुरू केल्या आहेत. सर्वपक्षीय उमेदवार निवडण्या संदर्भातील बैठका जोरदार सुरू असून त्यासाठीच्या गुप्त खलबतांनी जोर धरला आहे.
महानगर पालिका निवडणुकीत आपल्या पक्षाचा उमेदवार कोण असावा यांची निवड करण्यासाठी पक्ष नेते आणि कार्यकर्ते जोरात तयारी करत आहेत. मात्र अद्याप अर्जांची संख्या वाढलेली नाही.
गुरुवारी सुनावणी होती आणि सुनावणीनंतर निवडणुकीला स्थगिती मिळते की नाही यासंदर्भात मोठा संभ्रम होता, हा संभ्रम दूर झाला असून निवडणुकीला कोणत्या प्रकारे मनाई असणार नाही हे स्पष्ट झाले आहे त्यामुळे कदाचित उद्यापासून अर्ज भरणा प्रक्रियेला जोरात सुरुवात होईल. अशी शक्यता आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया किचकट असल्यामुळे त्यासाठी लागणारे वेगवेगळे प्रमाणपत्र जमा करण्याच्या कामात उमेदवार लागले आहेत.
अंतर्गत बैठकांना मोठ्या प्रमाणात ऊत आला आहे .या पार्श्वभूमीवर आता उद्यापासून अर्ज करण्याची प्रक्रिया जोरात सुरू होणार असे दिसत आहे.