Tuesday, January 14, 2025

/

शतायुषी जुनी झाडे ‘टॅग’ करण्याच्या मोहिमेचा शुभारंभ!

 belgaum

बेळगाव शहरात झपाट्याने होत असलेल्या शहरीकरणामुळे नष्ट होणाऱ्या शतायुषी जुन्या झाडांना वाचवण्याचा प्रयत्न करण्याच्या उद्देशाने द बायोडायव्हर्सिटी कमिटी ऑफ बेळगाव या जैवविविधता समितीतर्फे जुनी झाडे ‘टॅग’ करण्याची म्हणजे झाडे ‘चिन्हांकित’ करण्याची मोहीम आजपासून सुरू करण्यात आली.

द बायोडायव्हर्सिटी कमिटी ऑफ बेळगावतर्फे आज शनिवारी सकाळी आरटीओ कार्यालयानजीकच्या सोन्या मारुती चौक (संगोळी रायाण्णा चौक) येथील शतायुषी वडाच्या झाडापासून झाडे चिन्हांकित म्हणजे टॅग करण्याच्या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.

सोन्या मारुती चौकातील सदर वडाचे झाड 200 वर्षापेक्षा अधिक जुने आहे. सदर झाड ‘टॅग’ करण्याच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून शहरात हरित जागा निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे ग्रीन सेव्हीयर्सचे संचालक जयदीप लिंगाडे यांचा बायोडायव्हर्सिटी कमिटीतर्फे सत्कार करण्यात आला. Biodiversity

सदर कार्यक्रमाप्रसंगी बायोडायव्हर्सिटीचे सदस्य किरण निप्पाणीकर, पर्यावरण कार्यकारी अभियंता एच. व्ही. कलादगी, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ, वनखात्याचे आरएफओ मगदूम व पालिका पर्यावरण अभियंता अदिलखान पठाण यांनी समयोचित विचार व्यक्त केले.

चौकातील मारुती मंदिराचे पुजारी श्रीधर अनगोळकर यांनी यावेळी बोलताना माझ्या आजोबांच्या ताब्यात हे मारुती मंदीर देण्यात आले त्या आधीपासून सदर वडाचे झाड अस्तित्वात आहे अशी माहिती दिली. बायोडायव्हर्सिटी कमिटीच्या सदस्यांसह अभियंता प्रवीण, आरोग्य अधिकारी, पौरकार्मिक आणि पालिकेचे कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.