बेळगाव शहरात अंमली पदार्थांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात सुरू आहे. गांजा ,पन्नी आणि इतर अंमली पदार्थ विक्री करणारे रॅकेट्स शहरात आपला विस्तार वाढवू लागले आहेत.
शुक्रवारी माळमारुती पोलिसांनी या प्रकारे अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या दोघांना अटक करून त्यांच्याकडून चार किलो गांजा जप्त केला आहे.
माळमारुती पोलीस स्थानकाचे सी पी आय यांच्या नेतृत्वाखाली अंमली पदार्थ प्रतिबंधक पथकाने ही कारवाई केली असून तब्बल चार किलो गांजा जप्त करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
या पदार्थांचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू आहे. तरुण वर्गाला या जाळ्यात अडकविण्यात येत आहे. आरोपींकडून 4150 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला, पुढील तपास चालू आहे .