समितीला रामराम करून भाजप मध्ये गेलेले माजी महापौर शिवाजी सुंठकर यांच्यावर प्रचंड टीका झाली होती. पण शेवटी मराठी माणूस आपला स्वाभिमान जपतोच.
आत्ता सुरू असलेल्या मनपा निवडणुकीत स्वाभिमान बाळगून मराठीसाठी पुढाकार घेतलेल्या सुंठकर यांना भाजपच्या कारवाईचा फटका बसला आहे. पक्षातून बाहेर काढण्यात आल्याने त्यांना आता मराठी साठी पूर्णवेळ देता येणार आहे.
शिवाजी सुंठकर यांची भाजप पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. असा आदेशच निघाला आहे. यामुळे आता सुंठकर भाजपचे सक्रिय नसून मराठीसाठी काम करणारे अशी गणना होणार असून मराठी भाषिकांच्या सहानुभूतीचा फायदा त्यांना या आणि यापुढे होणाऱ्या निवडणुकात होणार हे नक्की बनले आहे.
शिवाजी सुंठकर यांना भाजप पक्षात घेण्यास भाजप मधील काहींचा सुरुवातीपासून विरोध होता. त्यांना पक्षातून बाजूला करण्याचे प्रयत्नही अनेकदा झाले पण यश आले नव्हते.
काही व्यक्ती त्यांच्यावरील कारवाईसाठी कारण शोधत होते. आता भाजप मध्ये राहून सुंठकर मराठी एकीसाठी काम करत आहेत हे दाखवून देऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याने सुंठकर यांचे महत्व मराठी माणसाच्या मनात आणखी वाढणार असून संबंधित पक्षाचा खरा चेहरा उघड झाला आहे.