गल्ल्या गल्ल्यातून मराठी भाषिकांची अभूतपूर्व अशी एकी दिसत असताना गुडघ्याला बाशिंग बांधलेले इच्छुक मात्र अडेलतटू पणा करत आहेत एकेका जागेसाठी अनेक मराठी भाषिकांनी अर्ज दाखल केले आहेत.मराठी मतांचे तुकडे तुकडे करण्याचे पाप यांच्या हातून घडत आहे आता पर्यंत भोगलेल्या सत्तेची फळं परत काही जण चाखण्यासाठी आतुर झाले आहेत.
बेळगावची मनपा निवडणूक ही मराठी माणसाची अस्मिता दाखवण्याचा मार्ग आहे याचाच विसर पडून काही जण आपलंच घोड पुढे दामटन्यात पुढे आहेत.मध्यवर्ती समितीने आपला उमेदवार आपण निवडा अशी अभिनव संकल्पना मांडून सर्व मराठी माणसाना निवडणुक प्रक्रियेच्या मध्यवर्ती ठिकाणी आणली आहे ही अभूतपूर्व घटना आहे. गल्लीतील पंच मंडळी युवक मंडळ आणि युवक मंडळांनी एकच एक उमेदवार उभा करण्याची जबाबदारी स्वीकारून खंबीरपणे निर्णय घेण्याची गरज आहे.या पाश्वभूमीवर दोन माजी नगरसेविकानी महिलांच्या वार्डातून एकीचे प्रयत्न चालवले आहेत
स्वतः महत्त्वाची पदे यापूर्वी निभावलेली आहेत त्यामुळे यावेळी निवडणुकीतून माघार घेत इतरांना संधी देणाऱ्या एक पाऊल पुढे असणाऱ्या महिलांनी काही वॉर्डांमध्ये जाऊन एकीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. वार्ड क्रमांक 49 च्या महिला उमेदवारांमध्ये एकीसाठी प्रयत्न करण्याचा प्रयत्न दोन महिला उमेदवारांनी केला आहे. यामध्ये माजी महापौर सरीता पाटील आणि माजी उपमहापौर रेणू किल्लेकर यांचा समावेश आहे.
आपण स्वतः मनाचा मोठेपणा दाखवून आपल्या वॉर्डात माघार घेत नव्या दमाच्या उमेदवारांना संधी देण्याचा प्रयत्न केल्यामुळे या दोन्ही महिलानी आदर्श निर्माण केला आहे. या पार्श्वभूमीवर एकाच वॉर्डात अनेक जणांनी अर्ज केल्याचे लक्षात आल्यानंतर स्वतःहून प्रयत्न करीत या दोन्ही महिला एकच उमेदवार रिंगणात राहावा यासाठी प्रयत्न करत आहेत.
कोणत्याही परिस्थितीत जास्तीत जास्त नगरसेवक महानगरपालिकेत निवडून यावेत हाच आपला उद्देश आहे त्यासाठी एकाहून अधिक उमेदवार उभे राहिले तर समितीचे नुकसान होणार आहे ,त्यामुळे वॉर्डा वॉर्डात जाऊन फूट निवारण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी बेळगाव live शी बोलताना सांगितले.