Wednesday, January 15, 2025

/

माझ्या आवडीचा सिंबॉल मिळावा

 belgaum

महानगरपालिका निवडणुकीत अर्ज भरणे आणि छाननी प्रक्रिया पार पडली आहे. आता अर्ज माघारी आणि निवडणुकीचे चिन्ह देण्याची प्रक्रिया शिल्लक आहे. त्या पार्श्वभूमीवर मला माझ्या आवडीचा सिम्बॉल मिळावा यासाठी उमेदवार देवाकडे धावा करू लागले आहेत .

काल झालेल्या उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत 7 उमेदवारी अर्ज अवैध झाले तर आता 468 उमेदवारी अर्ज निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यापैकी काहीजण माघार घेणार असून उर्वरित लोकांना सिम्बॉल दिले जाणार आहेत.

ते मिळाल्यानंतर खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात होणार आहे.
उमेदवारांनी वैयक्तिक भेटीगाठी घेऊन आपण निवडणुकीत उभा आहे आणि आपल्याला मतदान करा या प्रकारची माहिती आपल्या आपल्या वॉर्डातील मतदारांना देण्यास सुरुवात केली आहे.

या पार्श्वभूमीवर गुप्त बैठका होताना दिसतात .अनेक त्रुटी आढळल्या मुळे सात अर्ज रद्द झाले असले तरी 468 जणांनी मात्र योग्य पद्धतीने अर्ज भरला असल्याचे स्पष्ट झाले असून आता चिन्हे कोणती मिळतात याकडे लक्ष लागले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.