चव्हाट गल्ली पंच कमिटीने आपल्या वॉर्डातून ज्येष्ठ समिती नेते किसनराव येळ्ळूरकर यांचे सुपुत्र, प्रसिद्ध वकील अमर येळ्ळूरकर यांची अधिकृत उमेदवार म्हणून निवड केली आहे.
विशेष बैठक घेऊन ही निवड करण्यात आली असून याची माहिती महाराष्ट्र एकीकरण समितीला देण्यात आली आहे.
अनेक अपक्ष उमेदवार असल्याने विशेष बैठक घेऊन ही निवड जाहीर करण्यात आले आहे.
येळ्ळूरकर घराण्याचे समितीत योगदान मोलाचे आ हे. वडील किसनराव येळ्ळूरकर यांच्या पाठोपाठ अमर येळ्ळूरकर हे सुद्धा समितीत सक्रिय आहेत. याची दखल घेऊन पंच कमिटीने त्यांची सर्वानुमते अधिकृत उमेदवार म्हणून निवड केली आहे.
आता वॉर्ड क्र. 8 मधील इतर मराठी उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेऊन समितीच्या लढ्यात आपले योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.पंच प्रताप मोहिते यांच्या नेतृत्वाखालील समितीने ही निवड केली आहे. सदर निवड मध्यवर्ती समितीकडे सुपूर्द केली आहे आता मध्यवर्ती समिती याची घोषणा करणार आहे.
प्रभाग 15 आणि 16 मधून यांची निवड
वार्ड क्रमांक 16 मधून पंच मंडळींनी गणेश दद्दीकर यांची उमेदवारी तर प्रभाग 15 मधून लक्ष्मी वसंत पाटील यांची उमेदवारी स्थानिक पंचांनी अंतिम केली आहे व याचे पत्र समिती कडे पोचवले आहे
प्रभाग 16 शास्त्री नगर भागातील मधील पंच आणि तर 15 मधून महाद्वार रोड तानाजी गल्ली समर्थ नगर येथील पंचांनी लक्ष्मी वसंत पाटील यांना उमेदवारी द्यावी असे ठराव मध्यवर्ती समिती कडे सुपूर्त केले. या वरील तिन्ही उमेदवारांची निवडीची घोषणा मध्यवर्ती समिती करणार आहे.