महानगरपालिका निवडणुकीत अर्ज भरणा केलेल्या अपक्ष आणि रिबेल उमेदवारांवर सध्या राजकीय पक्षांकडून अर्ज माघारी घेण्यासाठी दबावतंत्र सुरू असल्याची माहिती उपलब्ध होत आहेत. अर्ज माघार घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. यापार्श्वभूमीवर कालची रात्र या दबावतंत्रातच गेली आहे. राजकीय पक्षांकडे आपल्याला उमेदवारी मिळण्यासाठी अर्ज केला होता मात्र उमेदवार निवड प्रक्रियेमध्ये त्यांची निवड झाली निवड झाली नाही त्यामुळे नाराज झालेल्या रिबेल उमेदवारांनी आपण स्वतः अपक्ष म्हणून पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधातच अर्ज केले आहेत.याचा फटका पक्षाच्या उमेदवारांना बसणार असल्याचे लक्षात येताच आता मोठ्या नेत्यांचा वापर करून दबाव तंत्र अवलंबले जात असल्याची माहिती मिळाली आहे .
यापार्श्वभूमीवर बुधवार दिनांक 25 रोजी दिवसभर आणि रात्री स्वतंत्र व गुप्त बैठका सुरू होत्या. अर्ज छाननीनंतर अर्ज माघार घेण्याची आजची शेवटची तारीख आहे. त्यामुळे आजच्या दिवशी अर्ज माघारी घेतला नसल्यास उमेदवारांचा समावेश मतपत्रिकेत उमेदवारांच्या यादीत होणार आहे. त्यामुळे आजच्या दिवशी जास्तीत जास्त लोकांनी अर्ज माघार घ्यावी त्यादृष्टीने राष्ट्रीय पक्षांनी प्रयत्न चालू ठेवले आहेत.
महाराष्ट्र एकीकरण समितीने अर्ज भरलेल्या अपक्ष मराठी उमेदवारांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच एकापेक्षा जास्त उमेदवार राहिल्यास मराठी मते विभागून राष्ट्रीय पक्षांना फायदा होऊ शकतो हे समजावून सांगण्यात आले आहे. यासंदर्भात संघटना पातळीवर नव्हे तर वॉर्ड पातळीवर प्रयत्न झाल्याने मराठी अपक्ष उमेदवारानी याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीने कळकळीचे आवाहन करून आजच्या दिवशी वाढीव आणि अधिकृत न ठरलेल्या मराठी अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घ्यावेत आणि अधिकृत उमेदवाराला आपला पाठिंबा द्यावा असे आवाहन केले आहे.
राष्ट्रीय पक्षांच्या बाबतीत दबावतंत्र सुरू झाल्यामुळे रिबेल उमेदवार आणखी नाराज होत असून दबावतंत्राच्या भितिला घाबरून आज काहीजण मोठ्या प्रमाणात अर्ज माघारी घेणार असल्याचे चित्र आहे. तर या भीतीला न जुमानणारे उमेदवार आपला अर्ज कायम ठेवणार आहेत.
माझ्यावर काही जुने गुन्हे होते, आता त्याचा काहीच सबंध नाही पण आता माघार न घेतल्यास ते गुन्हे उकरून काढण्याची धमकी दिली जात आहे. समजावून सांगण्यापेक्षा राष्ट्रीय पक्षांनी धमकी तंत्राचा वापर सुरू केला आहे. हे पूर्णतः चुकीचे आहे. असे एका उमेदवाराने बेळगाव live सोबत चर्चा करताना सांगितले.
Trending Now