बेळगाव शहरातील किल्ल्या नजीकच्या कोटेकेरी तलाव अर्थात किल्ला तलाव येथील विविध विकास कामांसाठी बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडने तीन टप्प्यातील निविदा काढल्या आहेत.
किल्ला तलाव येथील विकासकामांसाठी 3,32,53,814.93 रुपये खर्चाची निविदा काढण्यात आली आहे. या निधीअंतर्गत केल्या जाणाऱ्या विकास कामांमध्ये अंतर्गत आवार भिंत, पूरपरिस्थितीसाठी संरक्षक भिंत, आवार भिंत, विद्युतीकरण आदी कामांचा समावेश असणार आहे.
सदर विकास कामे पूर्ण करण्याची मुदत 9 महिने असणार आहे. तलावाच्या दुसर्या टप्प्यातील विकास कामांसाठी 1,81,97,000 रुपये खर्च केले जाणार आहेत.
या निधीअंतर्गत केल्या जाणाऱ्या विकासकामांमध्ये हार्डस्केप वर्क, एमएस गेट, गार्डरूम आणि स्टोअर रूम, गझेबो, किओस्क, पदपथ विद्युतीकरण, आयसीटीची कामे, बाह्य विद्युत सुशोभीकरण आणि अंतर्गत विद्युत सुशोभीकरण आदीं कामांचा समावेश असणार आहे. ही विकास कामे पूर्ण करण्याची मुदत 9 महिने देण्यात आली आहे.
तिसऱ्या टप्प्यातील विकास कामांसाठी 1,86,23,000 रुपये खर्चाची निविदा काढण्यात आली आहे. या निधीअंतर्गत लँडस्केपिंग, बागायत कामे, जिम, लहान मुलांचे खेळाचे साहित्य, विद्युतीकरण, फ्रीडम थीम पार्क, डायनासोर्स थीम पार्क आदी विकास कामांचा समावेश असणार आहे. ही विकास कामे देखील 9 महिन्याच्या कालावधीमध्ये पूर्ण करावयाची आहेत.