Tuesday, January 7, 2025

/

जगण्यासाठी नव्हे तर मृत्यूनंतर मोफत सेवा!

 belgaum

बेळगाव मनपा निवडणुकीच्या निमित्ताने जाहीरनामे घोषित करताना अनेक चमत्कारिक गोष्टी घडत आहेत. मतांची याचना करताना दिल्या जाणाऱ्या आश्वासनांमध्ये येणाऱ्या गोष्टी पाहिल्या की हसावे की रडावे हा प्रश्न सर्वभाषिक सामान्य नागरिकांना पडत आहे.

रविवारी भाजप ने जाहीर केलेला जाहीरनामा पाहिला की याचा अनुभव अनेकांना आला असून नागरिकांनी सोशल मीडियावरून यावर भरपूर टीका केली आहे.

भाजपने काल आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. यामध्ये भाजपने बेळगाव महानगरपालिकेवर आपली सत्ता आली तर मोफत अंत्यसंस्कार करण्याची सोय देऊ असे एक आश्वासन दिले. स्मशानभूमीत मृत होऊन गेल्यानंतर ही सोय मिळणार असल्याने आधी जगायला मदत करण्याऐवजी मृत्यू नंतर मदत देण्याच्या या प्रकाराची जोरदार चर्चा सुरू आहे.

कोरोना,महागाई,आरोग्यसेवांचा अभाव,वेळेत ऑक्सिजन मिळाला नाही अशा अनेक कारणांनी नागरिक मोठ्याप्रमाणात मृत होऊ लागले आहेत. याबाबतीत केंद्र आणि राज्यात असलेल्या भाजप सरकारने काहीतरी ठोस करण्याची गरज आहे. पण असे न करता जगवायचे सोडून हा पक्ष आता मोफत अंत्यसंस्कार करणार आहे का? असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे.

महाराष्ट्रातील काही शहरात स्मशानभूमीत मोफत अंत्यसंस्कार दिले जातात. लाकडे मोफत देणारी कोल्हापूर मनपा यासाठी प्रसिद्ध आहे. मात्र बेळगाव परिसरात ही सेवा कधीच मिळू शकली नाही. कोरोना काळात अंत्यसंस्कार करण्यासाठी सरकारी यंत्रणा अपयशी ठरली. मोफत तर सोडाच आपल्या नातेवाईकाला शेवटचे पाहण्याची संधी मिळाली नाही आणि हजारो रुपये खर्च करावे लागले.सामाजिक सेवा संघटना पुढे आल्या. यामुळे आधीच जनतेत तीव्र नाराजी आहे.

कोरोनाच्या विळख्यातून नागरिकांना बाहेर काढून लाट आल्यावर वाढणारे मृत्युदर कमी करण्यासाठी आणि अचानक मृत्युमुखी पडणाऱ्या नागरिकांना जगवण्याची गरज असताना या अजब जाहिरनाम्याने जनतेला चांगले वाटण्यापेक्षा अधिक त्रास झाल्याचेच उमटणाऱ्या प्रतिक्रियांवरून स्पष्ट होत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.