बेळगाव- धारवाड रेल्वेमार्गाच्या कामाचा ठेका राईट्सला;
बेळगाव: बहुचर्चित बेळगाव -धारवाड रेल्वेमार्गाच्या कामाचा ठेका राईट्स लिमिटेड (रेल इंडिया टेक्निकल अँड इकॉनोमिक सव्हिस) कम कंपनीला मिळाला आहे .केंद्र शासनाचा उपक्रम असलेल्या या कंपनीची स्थापना 1974 मध्ये झाली आहे. रेल्वे खात्याकडून बेळगाव -धारवाड सह तीन रेल्वेमार्गाच्या कामाची जबाबदारी या कंपनीकडे दिली आहे. बेळगाव -धारवाड सह व शिमोगा शिक शिकारीपुर राणेबेन्नूर -तुमकूर दवणगेरे या दोन रेल्वे मार्गाचे काम या कंपनीकडून केले जाणार आहे. तब्बल रु 4027 कोटी रुपये या तिन्ही रेल्वेमार्गासाठी खर्च केले जाणार आहेत.
सध्या आंध्र प्रदेश मधील गुटी ते धर्मावरम तसेच अन्नूपूर – पेंड्रा या दोन रेल्वे मार्गाचे काम कंपनीकडून सुरू आहे .ही दोन्ही कामे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत .बेळगाव -धारवाड रेल्वे मार्ग अनेक वर्षे चर्चेत आहे. बेळगावचे दिवंगत खासदार सुरेश अंगडी रेल्वे राज्यमंत्री असताना प्रकल्प मंजूर झाला. या प्रकल्पाच्या कामासाठी कंपनी ही नियुक्त झाली आहे .त्यामुळे अनेक वर्षापासून रखडलेला प्रकल्प मार्गी लागणार आहे .बेळगाव -धारवाड रेल्वे मार्ग राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 ल समांतर असेल.97 किमी लांबीच्या या रेल्वेमार्गासाठी रू545 कोटी रुपये निधी खर्च केला जाणार आहे .या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी चा खर्च राज्य शासनाकडून दिला जाईल.
2021-22 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात तरतूदही केली आहे .या मार्गासाठी 2003 मध्ये सर्वेक्षण सुरू झाले होते. 2012 मध्ये सर्वेक्षण अहवाल रेल्वे बोर्डाकडे सादर केला होता या रेल्वे मार्गावर एकूण 13 थांबे असतील त्यात हलगा ,गणी कोप्प, तिगडी संप गाव ,बैलवाड, बैलहोंगल ,नेगीनहाळ, कित्तूर,हेग्गेरी, तेगुर,मोमीनगट्टी, क्यारकोप्प यांचा समावेश आहे. बेळगाव व क्यारकोप्प येथे रेल्वे जंक्शन होणार आहे. या मार्गातील रेल्वेचा प्रवास कमी खर्चात व कमी वेळात होणार आहे. बेळगाव व धारवाड ही दोन शहरे नव्या रेल्वे मार्गामुळे आणखी जवळ येणार आहेत .त्यामुळे दोन्ही शहरांच्या विकासा च्या दृष्टीने हा मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे.
बेळगाव -धारवाड (व्हाया कित्तूर 73 किमी -335 हेक्टर जमीन) या मालकासाठी 50 कोटी रुपये राखीव ठेवले आहेत .केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी 1 फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प सादर केला बेळगाव- कित्तूर- धारवाड(Belgaum to Dharwad via kittur) या रेल्वेमार्गाला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली होती आता या रेल्वेमार्गासाठी जमीन हस्तांतरण करण्यासाठीचे प्रयत्न सुरू करण्यात आले .आहेत बेळगाव व धारवाड जिल्ह्यातील एकूण 335 हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. नियोजित बेळगाव धारवाड व्हाया कितूर या रेल्वे मार्ग मध्ये शेकडो हेक्टर सुपीक जमीन जाणार आहे .बेळगाव धारवाड नूतन रेल्वे मार्ग नंदिहल्ली, गर्लगुंजी व नागेनहट्टी गावावरून जाणार आहे. बेळगाव धारवाड या नव्या रेल्वेमार्गासाठी अंदाजे 927 कोटी खर्च येणार आहे 73 कि. मी. रेल्वेमार्गासाठी एकेरी रेल्वेमार्ग घालण्यात येणार आहे.
कितूर मार्गे होणाऱ्या नव्या रेल्वे मार्गामुळे तासाभरात बेळगाव धारवाड असा रेल्वे प्रवास करता येणार आहे .तसेच 31 कि. मी. चे अंतर कमी होणार असल्याने वाहतुकीलाही चालना मिळणार आहे .या नवीन मार्गावर बेळगाव सह देसुर के.के.कोप्प बागेवाडी, एम. के.हुबळी, हुलीकट्टी, कितुर, तेगुर,ममिगट्टी, क्यारकोप्प आणि धारवाड अशी स्थानके असतील.