Wednesday, December 25, 2024

/

अफगाणिस्तान येथे अडकलेल्यांना वाचवणार उमेशकुमार

 belgaum

उमेश कुमार, आयपीएस, एडीजीपी सीआयडी यांची अफगाणिस्तानातील कर्नाटकमधील रहिवाशांशी संबंधित कार्यासाठी समन्वय साधण्यासाठी नोडल अधिकारी म्हणून निवड करण्यात आले आहे. या संदर्भात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. अफगाणिस्थान मध्ये अडकलेल्या व्यक्तींनी आपली संबंधित माहिती खालील नंबर आणि ईमेल वर पाठवल्यास मदत मिळू शकते.

080-4984444
9480800187
[email protected]

माहिती थेट MEA ला देखील दिली जाते.

खालील माहिती सादर करणे आवश्यक आहे ..

माहिती देणारे नाव, संपर्क क्रमांक, पत्ता, संबंध

अफगाणिस्तानात राहणाऱ्या व्यक्तींचे नाव, त्यांचे सध्याचे स्थान, व्यवसाय/भेटीचा उद्देश, पासपोर्ट तपशील, अफगाणिस्तानमध्ये आगमन तारीख ही माहिती द्यावी लागणार आहे

Afganistan

काय आहे तालिबान?

अफगाणिस्तानात सत्तेवर असलेल्या तालिबान संघटनेला 2001 मध्ये अमेरिकेने बाहेरचा रस्ता दाखवला होता. पण हळूहळू या संघटनेने स्वतःची पाळेमुळे पुन्हा देशात रोवली.

तालिबानचे सैनिक अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबुल शहराच्या सीमेपर्यंत पोहोचले आहेत. अफगाणिस्तानातील सर्व मोठ्या शहरांवर तालिबाननं कब्जा केला आहे.तालिबान संघटना नेमकी आहे काय? तिचा उदय कधी झाला? हे जाणून घेऊया…

पश्तो भाषेत विद्यार्थ्यांना तालिबान म्हणून संबोधलं जातं.

90 च्या दशकात सोव्हिएत संघ आपले सैनिक अफगाणिस्तानातून परत बोलवत होतं, त्याच दरम्यान देशात तालिबान संघटना उदयाला आली.

पश्तो आंदोलन सुरुवातीला धार्मिक मदरशांमधून सुरू झालं. या माध्यमातून कट्टर सुन्नी इस्लामचा प्रसार-प्रचार केला जायचा. त्यासाठी सौदी अरेबियाने आर्थिक पुरवठा केला.

याच दरम्यान दक्षिण-पश्चिम अफगाणिस्तानात तालिबानचा प्रभाव वेगाने वाढला. सप्टेंबर 1995 मध्ये त्यांनी इराणशी लागून असलेल्या हेरात प्रांतावर ताबा मिळवला. त्यानंतर एका वर्षाने तालिबानने अफगाणीस्तानची राजधानी काबुल शहरावरही नियंत्रण मिळवलं.

त्यावेळी अफगाणिस्तानाची सत्ता बुरहानुद्दीन रब्बानी यांच्या हाती होती. ते त्यावेळी सोव्हिएत सैनिकांचा विरोध करणाऱ्या अफगाण मुजाहिदीन संघटनेच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते.

तालिबानने सर्वप्रथम रब्बानी यांना सत्तेवरून हटवलं.

1998 येता-येता सुमारे 90 टक्के अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळवला.

सोव्हिएत संघाचे सैनिक परतल्यानंतर अफगाणिस्तानातील सर्वसामान्य नागरीक मुजाहिदीन सत्ताधाऱ्यांचे अत्याचार आणि अंतर्गत कलहाला कंटाळले होते. त्यामुळे सर्वसामान्यांनी सुरुवातीला तालिबानचं स्वागत केलं.

भ्रष्टाचारावर अंकुश, अराजकतेच्या परिस्थितीत सुधारणा, रस्तेबांधणी तसंच विशिष्ट पद्धतीची प्रशासन यंत्रणा उभारणं, लोकांना सुविधा पुरवणं यांसारख्या कामांमुळे सुरुवातीच्या काळात तालिबान संघटना लोकप्रिय झाली.

याच दरम्यान तालिबानने शिक्षा देण्यासाठी इस्लामिक पद्धतीचे कायदे देशात लागू केले.

यामध्ये हत्या आणि अत्याचाराचे आरोप असलेल्या दोषींना सार्वजनिकरित्या फासावर लटकवणे, चोरीच्या प्रकरणातील दोषींचे अवयव कापणे, अशा प्रकारच्या शिक्षांचा समावेश होता.

पुरुषांनी दाढी वाढवणं आणि महिलांनी संपूर्ण शरीर झाकणाऱ्या बुरख्याचा वापर करणं अनिवार्य करण्यात आलं.

तालिबानने टिव्ही, संगीत आणि सिनेमा यांच्यावर बंदी घातली. 10 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या मुलींनी शाळेत जाण्यावर बंदी घालण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.